मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने पोलिस आयुक्त मुंबई पोलिस यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. या तक्रारीत तिने धनंजय पंडीतराव मुंडे हे आपले नातेवाईक असल्याचे नमुद केले आहे.
या तक्रार अर्जात सदर पिडीत तरुणीने म्हटले आहे की धनंजय मुंडे यांचे समवेत तिची ओळख सन 1997 मधे इंदोर (मध्य प्रदेश) येथे झाली होती. त्यावेळी तिचे वय 16 – 17 वर्ष होते. शरीर संबंध प्रस्थापित करतांना व्हिडीओ शुट केल्याचे देखील पिडीत तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. बॉलीवुड मधे गायीका होण्यासाठी मदत करण्याचे आमीष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.