वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट

On: June 30, 2020 6:53 PM

पुणे: एका एस्कॉर्ट वेबसाईटच्या माध्यमातून बाणेर येथील रो हाऊसमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश चतु:श्रृंगी पोलिसांनी केला आहे. सदर हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय एक बँक मॅनेजर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर चालवत होता. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बुकिंगसाठी वापरण्यात येणारे ११ मोबाईल, ४ लॅपटॉप, १ आयपॅड तसेच कार जप्त केल्या आहे.

रविकांत बालेश्वर पासवान (रा. सुसगाव, मुळ बिहार), दीपक जयप्रकाश शर्मा (रा. अंबर अपार्टमेंट, बालेवाडी, मुळे ओरिसा), सुरेश प्रल्हाद रणवीर (रा. बाणेर), रो हाऊस मालक नाकसेन रामदास गजघाटे (रा. बावधन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रविकांत पासवान हा पुणे जिल्ह्यातील मुरुम येथील बँक ऑफ बडोदा शाखेचा बँक मॅनेजर आहे. दिपक शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बाणेर येथील ओयो हॉटेल रो हाऊस मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment