मनिष कथुरीयांची स्वखर्चाने पोलिस संरक्षणाची मागणी

जळगाव : जळगाव शहर मेहरुण तलाव परिसरातील रहिवासी मनिष कथुरीया यांना गेल्या 4 जानेवारी रोजी पाच ते सहा जणांनी त्यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीबाबत मनिष कथुरीया यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दिली असून स्वखर्चाने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. या मारहाणीच्या घटनेचा तपास अद्याप सुरु आहे.

विकास मनिलाल परिहार, संजय मनिलाल परिहार व इतर काही लोकांनी मेहरुण तलाव परिसरातील रहिवासी मनिष कथुरीया यांच्या निवासस्थानी 4 जानेवारी रोजी पावणे आठ वाजेच्या सुमारास सामुहिकरित्या प्रवेश केला होता. विनापरवानगी आलेल्या या समुहास मनिष कथुरीया यांनी घरात प्रवेश करण्यास मज्जाव केला असता त्यांनी कथुरीया यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली होती.

मनिष कथुरीया यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार विकास परिहार या व्यक्तीने त्यांना बेदम मारहाण केली. विकास परिहार या व्यक्तीने मनिष कथुरीया यांच्या शर्टाची कॉलर पकडून इतर लोकांनी त्यांना ढकलत ढकलत इमारतीच्या वरील मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात नेले. कथुरीया यांच्या कार्यालयात त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. दरम्यान विकास परिहार या व्यक्तीने कथुरीया यांच्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीचे डिव्हीआर डीव्हाईस, इंटरनेट व टेलीफोनची वायर तोडून नेट बंद केले. दोन्ही डीव्हाईस काढून आणलेल्या कारमधे ठेवण्यात आले. 

मनिष कथुरीया यांनी तक्रारीत पुढे नमुद केल्याप्रमाणे इतर चौघांनी मनिष कथुरीया यांना घेरुन बसवून ठेवले. ऑफीस व कार्यालयाची झडती घेवून कपाटातील रोख 56000 रुपयांची रोकड व जळगाव जनता बॅकेचे चेकबुक काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सक्ती करण्यात आल्याने मनिष कथुरीया यांनी चेकवर सही केली. त्यावेळी मोबाईल हिसकावून घेण्यात आला. 

या मारहाणीनंतर घाबरलेल्या मनिष कथुरीया यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून घडल्या प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली. तक्रारीनंतर कथुरीया यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्रलंबीत असल्याचे समजते. या घटनेमुळे भयभीत मनीष कथुरीया स्वखर्चाने पोलिस संरक्षण घेण्यास तयार असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. विकास परिहार यांच्यावर न्यायालयात खटला सुरु असल्याचे देखील समजते. विकास मणीलाल परिहार हे जळगाव आरटीओ कार्यालयानजीक असलेल्या दिशा अकॅडमीचे संचालक असल्याचे समजते. तसेच तळघरात सुरु असलेले त्यांचे दिशा अकॅडमीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे देखील म्हटले जात आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी एमआयडीसी पोलीसांचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here