पोलीस बाप उठला कोवळ्या जिवावर पट्ट्याचे वळ उठले लेकराच्या पाठीवर

नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी व रेल्वे पोलिस असलेल्या बापाने आपल्या पोटच्या बालकाला पट्ट्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार या रेल्वे पोलिसाने दुस-या पत्नीच्या मदतीने केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. ज्या बालकाला अंगा खांद्यावर खेळवले पाहिजे त्या

बालकाला वर्दीच्या पट्ट्याने मारहाण करणा-या नराधम बापाने कृरतेची सिमा ओलांडली असल्याचे म्हटले जात आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराला मारतात त्या पद्धतीने या निष्पाप बालकाला रेल्वे पोलिस व त्याच्या दुस-या पत्नीने केलेल्या मारहाणीमुळे संतापाची लाट उसळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here