जळगाव : पायी चालणा-या मोबाईलधारकांच्या हातातील मोबाईल धुम स्टाईलने चोरी करणारे तिघा चोरट्यांना एलसीबी पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील संभाजी नगर, सागर पार्क, एम.जे. कॉलेज परिसर, महाबळ रोड अशा विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना झाल्या होत्या. बहुतेक गुन्हे हे रात्री सात ते दहा वाजेच्या आत झाल्याचे दिसून येतात. यावेळी पायी चालणारे अथवा शतपावली करणारे लोक मोबाईलवर बोलण्यात गर्क असल्याचा फायदा घेत मोबाईल चोरीचे गुन्हे घडल्याचे दिसून येतात.
मोबाईल चोरीच्या या घटना लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांना तपासकामी रवाना केले होते. 12 ते 15 जानेवारी दरम्यान घडलेल्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. यात तिघांना अटक करण्यात आली असून यात 15 ते 17 वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासकामी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, श्रीकुष्ण पटवर्धन, पोहेकॉ. दिनेश बडगुजर, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी , प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, विजय शामराव पाटील, नंदलाल पाटील , भगवान पाटील, सचिन महाजन, दर्शन टाकणे, पोहेकॉ. इंद्रीस पठाण, पंकज शिंदे यांनी तपासकामी सहभाग घेतला.