हौसेपोटी चोरली वाहने;रेकॉर्ड वरील दोघे अटकेत

On: June 30, 2020 7:44 PM

पिंपरी: हौसेपोटी दुचाकी वाहने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा आरोपीतांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजारांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.

किरण ऊर्फ दाद्या गौमत शिंदे (रा. आदर्शनगर, पाचपीर चौक, काळेवाडी, मुळ रा. गांधीनगर, पिंपरी), सुनील मल्हारी तलवारे (रा. भारतनगर, पिंपरी) अशी त्यांची नावे आहेत.

हर्षल राजन सांगुळे (मिहीर अपार्टमेंट, सुखवानी पार्क, अजमेरा, पिंपरी) यांनी ०९ जूनच्या रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांची दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली होती. . याप्रकरणी हर्षल सांगुळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तपास पोलिसांमार्फत सुरू असतांना गस्तीवर पोलिसांना टेल्को रोड, चिंचवड येथे एका दुचाकीवरून आरोपी शिंदे व तलवारे हे भरधाव वेगाने जातांना दिसले. त्यांना थांबवून हटकण्यात आले. त्यांनी हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्याकडून तिन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment