नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत एका महिलेने आत्महत्या केल्याप्रकरणी गंगापुर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. आत्महत्या करणारी महिला साधारण पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली.
पल्लवी गायकवाड असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या महिला कर्मचा-याचे नाव आहे. सदर महिलेने आत्महत्या केली त्यावेळी ती घरात एकटीच होती. पल्लवी गायकवाड ही कर्मचारी एमपीए वसाहतीत वास्तव्याला होती. आत्महत्या का केली हे अद्याप समजले नाही. एका तरुणाने देखील अकॅडमीत यापुर्वी आत्महत्या केली होती. ती घटना ताजी असतांना ही घटना घडली आहे.