एटीएम चोरी प्रकरणी मास्टर माईंड ताब्यात

On: June 30, 2020 7:51 PM

पिंपरी: एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडला गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट पाचच्या पथकाला यश आले आहे. आरोपीस निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेहरबानसिंग तारासिंग डांगी (ओटा स्किम, निगडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आरोपी मेहरबानसिंग डांगी याने त्याचे साथीदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांच्या मदतीने चिंचवड, थरमॅक्स चौकातील एटीएम मशीन ९ जून रोजी चोरून नेले होते.  निगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी डांगी याने या एटीएमची रेकी केली होती. त्या रेकीनुसार चोरीचे नियोजन केले होते.

आरोपी डांगी सेंट्रल चौकात येणार असल्याची माहिती मिळताच दबा धरुन बसलेल्या शोध पथकाने तो येताच त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment