जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवत आदर्श हिंदुत्वाचे कार्य करणारे हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसूर्य धनंजयभाई देसाई यांचे 21 जानेवारी रोजी जळगावात आगमन होत आहे. ते सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
धनंजयभाई देसाई 21 जानेवारी रोजी शहरातील केमिस्ट भवन येथे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत युवकांची भेट घेणार आहेत. यावेळी ते आदर्श व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्ती तसेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व अशा विविध विषयांवर आपेल मनोगत व्यक्त करणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांना खुप वर्षांनी धनंजयभाई देसाई यांचे विचार ऐकण्याची संधी यावेळी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवा वर्ग यांनी केमिस्ट भवन येथे गुरुवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हजर राहण्याचे आवाहन मोहन तिवारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.