अमेरीकेचे नुतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नवा इमिग्रेशन कायदा आणणार आहेत. युएस सिटीझनशिप अॅक्ट 2021 असे त्या कायद्याचे नाव राहील. या कायद्यानुसार अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांच्या ग्रीन कार्डसंदर्भातील यापुर्वीच्या ट्रम्प प्रशाससाने घालुन ठेवलेल्या मर्यादा बाजुला करण्यात येणार आहेत. या कायद्यामुळे भारतीयांना दिलासा मिळेल.
अमेरीकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथविधी पुर्ण केल्यानंतर इमिग्रेशन कायद्यात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. विविध देशातून किती नागरिकांना वास्तव्याची परवानगी दिली जावी याबाबतीत असलेली मर्यादा बाजुला केली जाण्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. अमेरीका फर्स्ट या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ना-यामुळे अमेरीकेत वास्तव्य करणा-या आणि अमेरिकेत जाण्याची तयारीत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुसर झाली होती. ती आता या कायद्याने पुन्हा उजळणार आहेत.