नागपूर: गुंडांना धडा शिकवा असे निर्देश आज नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी अधिकारी वर्गाला दिले. आज झालेल्या क्राईम मिटींगमधील चर्चे दरम्यान त्यांनी अधिकारी वर्गाला विविध सुचना दिल्या.
गेल्या काही दिवसापासून नागपूर शहरात खूनाच्या घटनात वाढ झाली आहे. अगदी किरकोळ कारणावरुन देखील खूनाच्या घटना शहरात घडल्या आहेत. या घटनेतील आरोपी कुविख्यात गुन्हेगार आहेत.
अशा स्वरुपाच्या घटनांमुळे पोलिस दलाची प्रतिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असल्याचे त्यांनी अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिले.





