जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होत असलेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, जळगांव जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने वरिष्ठ (खुल्या) गटासाठी निवड चाचणी शनिवार 23 जानेवारी रोजी घेण्यात येईल. सदर निवड चाचणी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळा, शिरसोली मार्ग जळगाव येथे घेतली जाणार आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपली नावे 9422278936 या व्हॉटअप क्रमांकावर 22 जानेवारी पावेतो सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी झालेल्या खेळाडूंनी निवड चाचणीच्या तारखेला सकाळी साडे आठ वाजता पांढ-या पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्य, आधार कार्ड, निवड चाचणी शुल्क ₹ 100 घेऊन उपस्थित राहण्याचे मानद सचिव अरविंद देशपांडे यांनी कळवले आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत जळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.