सोन्याच्या दरात घट

नवी दिल्ली : जागतिक वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर भारतात देखील सोने व चांदीच्या किमतीत घट झाली आहे. दिल्ली सराफा येथे सोन्याच्या किमती 263 रुपयांनी कमी होत 48,861 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. चांदीची किंमत 806 रुपयांनी घसरली असून ती 66,032 रुपये प्रती किलो झाली आहे.

गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी म्हटले आहे की जागतिक वायदे बाजारासोबत भारतीय वायदे बाजारात देखील सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे स्पॉट मार्केटमधील सोन्याचे भाव कमी झाले आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे भाव चे दर 1,861 डॉलर प्रति औंस व चांदीचे भाव 25.52 डॉलर प्रती औंस असे झाले. सोन्याचे भाव 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यानंतर दिर्घ कालावधीतील गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here