मारहाणीसह चोरी प्रकरणी परिहार बंधूंवर गुन्हा दाखल

On: January 23, 2021 4:30 PM

जळगाव : शैक्षणीक संस्थेच्या वादातून संस्था चालक मनिष कथुरीया यांना त्यांच्या कार्यालयात येवून मारहाण केल्याप्रकरणी परिहार बंधूंसह इतरांवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 जानेवारी रोजी खासगी संस्था चालक असलेले मनिष कथुरिया यांना मेहरुण तलाव परिसरातील त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात येवून विकास परीहार व संजय परीहार व त्यांच्यासोबत आलेल्या सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या कार्यालयातील डीव्हीआर, इंटरनेट हब, 56 हजार रुपये रोख तसेच बॅंकेचे चेक बुक असा ऐवज परिहार बंधूंनी नेल्याचे कथुरिया यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सचिन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment