पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी

उमरखेड (यवतमाळ) : महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. याला नेमके जबाबदार कोण आहे हे जनता ओळखून आहे. महसुल यंत्रणेचा वचक कमी झाला असल्याचे या निमीत्ताने दिसुन येत असल्याचे खुलेआम बोलले जात आहे.
उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात्ते जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. शनिवारी मध्यरात्री वाळू तस्करी करणा-या वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी एकाने वैभव पवार यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यात पवार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here