मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका महिलेसह सुमारे दहा वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कुणीतरी या मृतदेहांचे मुंडके कापून नेल्याचे लक्षात येत आहे.

शेवगाव पोलिस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेहांचे मुंडके गायब असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही त्यांना मृतदेहांचे मुंडके आढळून आले नाही. मृतदेहाजवळ भांडी, पेटी, पोते, गोणपाट असे साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. मृतदेहाचे केवळ धड असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here