पैशाच्या तगाद्यामुळे प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

On: January 24, 2021 7:01 PM

नाशिक : चार दिवसांपूर्वी नाशिक शहरातील म्हसरुळ भागात झालेल्या विवाहितेच्या खूनाचा उलगडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पूजा आखाडे असे निर्घृण खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

आर्थिक देवाण घेवाणीसह संशयातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर भास्कर या रिक्षाचालक प्रियकरास अटक केली आहे. 20 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रस्त्यावर पूजा आखाडे या विवाहितेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिचा धारदार शस्त्राने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणी मोरे मळ्यातील रहिवासी रिक्षाचालक सागर भास्कर यास ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यत आली. त्याने दिलेल्या माहितीतून खरा प्रकार समोर आला. त्याने त्याची विवाहीत प्रेयसी पुजाचा खून केल्याचे उघड केले. सागर व पुजाचे अनैतीक संबंध होते. पुजाने सागरला 80 हजार रुपये उधार दिले होते. ते पैसे सागरला परत करता आले नाही. मात्र पुजा सागरकडे सतत तगादा लावून पैशांची मागणी करत होती. तिच्या तगाद्याला वैतागून त्याने विवाहीत प्रेयसी पुजाचा चाकूने सपासप वार करत खून केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment