मायफ्रीकॅम्स नावाच्या पॉर्न वेबसाईटचा डेटा लिक झाल्यामुळे तब्बल विस लाख युझर्सची माहिती धोक्यात आली आहे. या वेबसाईटचा डेटा लिक झाल्याने युझर्सची नावे व मेल आयडी अशी महत्वाची माहीती देखील लिक झाली आहे. या माहितीमधे युझर्सच्या पासवर्डचा देखील समावेश आहे.
युझर्सचा डेटाबेस हॅकर्स विकत असल्याचे समजते. सुमारे दहा हजार युझर्सच्या डेटा खरेदी विक्री साठी बिटकॉईनच्या रुपात 1500 डॉलर्सचा व्यवहार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. दहा हजार युझर्सचा डेटा विकत घेणारे त्या डेटाच्या माध्यमातून किमान दहा हजार डॉलर्सचा नफा काढू शकतात.