राज्य पोलिस दलाने पटकावली 57 पदके

नागपूर : गुणवत्तापूर्ण सेवा देत महाराष्ट्र पोलीस दलाने तब्बल 57 पदके मिळवून दिली आहेत. राज्य पोलिस दलाने प्रथम तिनमधे मानाचे स्थान मिळवण्यात यश संपादन केले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या जिवासह मालमत्तेचे रक्षण करण्यासह नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्यात महाराष्ट्र पोलिस दल नेहमीच अग्रेसर राहीला आहे.
पोलिसांच्या एकुणच कामगिरीचा राष्ट्रीय पातळीवर राज्यनिहाय स्वतंत्र आणि सांघिक रुपात तुलनात्मक आढावा घेत त्यांना विविध प्रकारची पदके प्रदान करण्यात येतात. साहसी कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमजी), राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान केली जातात. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य आणि गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची यादी जाहीर केली जाते.

या वर्षी देशातील विविध राज्यातील सुरक्षा दलास पदके घोषीत झाली. या यादीत महाराष्ट्र पोलीस दलास 13 शौर्य, विशेष उल्लेखनीय सेवेसाठी 4, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 अशी एकुण 57 पदके मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here