भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक लिखाण करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या लिखानाबाबत भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

अ‍ॅड.भरत पवार यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिले आहे. त्यात सदर मागणी केली आहे. पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अ‍ॅड. भरत पवार यांच्या तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भा.दं. वि कलम 500, 501, 502 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here