माजी सैनिकांचा सन्मान

जळगाव : भारतीय राष्ट्रीय युवा परिषद भुसावळ व रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी “एक दिवस सैनिकांसाठी” हा उपक्रम राबवण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या, देशप्रेमाने भारावलेल्या,  जनसामान्यांच्या रक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

भुसावळ येथील संजय पाटील, रवी चौधरी व परशुराम चौधरी या  तीन माजी सैनिकांचा त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी भुसावळ येथील रितेश भारंबे, जागृत पाटील, मयुर सपकाळे व आदील तडवी आदी युवक हजर होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here