चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी महिला अटकेत आधी आवळला गळा, त्यानंतर पाण्यात बुडवले डोके

On: July 1, 2020 9:05 PM
crimeduniya

मुंबई: अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना तसेच कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.  मुंबईच्या अंधेरी परिसरातील सहार रोड भागात अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे.  संतोषी माता नगर येथील एका २९ वर्षीय महिलेनं जुन्या वादातून ४ वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली आहे.  

आरोपी महिलेचा मयत मुलाच्या आई-वडिलांशी जुना वाद होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्या महिलेने सुड भावनेतून वर्षांच्या श्रेयस कदम या बालकाची हत्या केली. मधू गाधे (२९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला सहार पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तिने ४ वर्षांच्या चिमुरड्याला सोमवारी रात्री पहिल्या माळ्यावरील घरात बोलवले. त्यानंतर मधू गाधे या आरोपी महिलेने लेगीज पँटीने चिमुरड्याचा गळा आवळला.

एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने तिच्या बाथरुममधे पाण्याने  भरलेल्या बादलीत त्याचे डोके  बुडवले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिने आपला गुन्हा कबुल करत माहिती दिली.या गुन्हयाप्रकरणी सहार पोलीस स्टेशनला भा. दं. वि. ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ती  अटकेत आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment