जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती वेतन निश्चिती व उपदान मिळण्यासाठीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्याकामी मोबदला म्हणून तिन हजार रुपयांच्या लाचेची मागणी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकास भोवली. सिकंदर सायबू तडवी असे लाचेची मागणी करणा-या वरिष्ठ सहायकाचे नाव आहे. यावल येथील पंचायत समिती कार्यालयात तिन हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. एसीबीचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सहायक फौजदार रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांच्या पथकाने सदर कारवाईत सहभाग घेतला.