सातवीची विद्यार्थीनी सरांसोबत लग्नासाठी रफूचक्कर

On: January 27, 2021 9:58 PM

नाशिक : सर मला आवडतात, त्यामुळे सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात असल्याचा मजकुर लिहून सातवीच्या विद्यार्थीनीने पलायन केल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील देवपुर या गावी उघडकीस आली आहे.

इयत्ता दुसरीपासून सदर विद्यार्थीनी ट्युशनसाठी पंकज श्याम साळवे नावाच्या तेवीस वर्षाच्या शिक्षकाकडे जात होती. दुसरी ते सातवी दरम्यान शिक्षण घेत असतांना तिचे तिच्या सरांवर प्रेम जडले. सर मला आवडतात त्यामुळे मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात असल्याचा मजकूर लिहून तीने घरातून पलायन केले आहे.

तिच्या कुटूंबीयांनी पंकज साळवे या शिक्षकाकडे जावून तपास केला असता त्याच्या घराला कुलुप दिसून आले. त्यामुळे तिच्या कुटूंबातील सदस्यांनी निफाड पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पंकज साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शिक्षक हा एका शाळेत हंगामी तत्वावर काम करतो. तसेच तो तिन ते चार ठिकाणी क्लासेस घेवून आपला चरितार्थ चालवतो. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या लिखीत मजकुराला फारसे महत्व नसले तरी निफाड पोलिस त्या शिक्षकाचा तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment