सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

On: January 28, 2021 10:50 AM

आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसुन येत आहे. भारतात प्रती दहा ग्रॅम (1 तोळे) सोन्याच्या मागे 330 रुपयांची घट झाली असून सोन्याचे भाव 48000 रुपये प्रती तोळे झाला आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळ्यासाठी 48000 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी 49330 रुपये लागणार आहेत. 26 व 27 जानेवारीला सोन्याचे भाव जवळपास स्थिर होते.
गेल्या आठवड्यात तोळ्यामागे सोन्याच्या भावात 230 रुपयांची घसरण झाली होती. जानेवारी महिन्यातील 330 रुपयांची घसरण दर्शवण्यात येत आहे.
२३ जानेवारीला प्रति १० ग्रॅम सोन्यामागे २३० रुपयांची घट झाली होती. त्यानंतर आज जानेवारी महिन्यातील सर्वाधिक ३३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक या चार शहरात 22 कॅरेट सोन्याकरीता 48000 रुपये लागतील. बंगळुरु, हैद्राबाद व केरळ येथे 45,750 या भावाची नोंद झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment