खा. अमोल कोल्हे यांच्या नावे फसवणूकीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

On: January 28, 2021 11:40 AM

पुणे : बांधकाम व्यावसायीकास फोनवर आपण खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे खोटे सांगून फसवण्याचा प्रयत्न करणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. लॉकडाऊन काळात हा प्रकार घडला होता.

विशाल अरुण शेंडगे (32)टिळेकरनगर, कोंढवा असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील त्याचा साथीदार सुरेश बंडू कांबळे याचा शोध सुरु आहे. विशाल याने यापुर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावे फोन करुन कित्येकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.

विशाल शेंडगे याने गेरा बिल्डर्स यांना फोन करुन मदतनिधीची मागणी केली होती. चौकशी अंती खा. कोल्हे यांनी फोन केला नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या घटनेबाबत गेरा बिल्डर्स यांनी पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment