यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य फरार संशयीत आरोपी तथा पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीनावर सोमवार 1फेबुवारी रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे.
30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या झाली होती. या खून प्रकरणी आतापर्यंत पाच जण अटकेत आहेत. मात्र मुख्य संशयीत फरार बाळ बोठे याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान बोठे याने जामीनासाठी अर्ज केला असून तो जामीनाच्या प्रयत्नात आहे. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने बोठे याचा जामीन फेटाळून लावला. त्यामुळे त्याने औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
युक्तीवादासाठी मुदत वाढवून मिळण्याकामी बोठे याच्या वतीने न्यायालयास विनंती करण्यात आली. त्यानुसार मुदत वाढवून देत पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.