जळगाव : फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी दयाराम गौतम सोनवणे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी दिले आहे.
दयाराम सोनवणे यास अटक करण्याकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, महेश महाजन, इशान तडवी यांनी सहभाग घेतला. पथकाने त्याला समतानगर भागातील वंजारी टेकडी परिसरातून ताब्यात घेतले.