जवानाकडून गर्भवती पत्नीची हत्या;हत्येनंतर केली आत्महत्या

On: July 2, 2020 2:05 PM

पुलगाव: वर्धा जिल्हयातील पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.  पाणी पिण्याच्या बहाण्याने सैनिक घरी आला होता. त्यावेळी त्याने हे कृत्य केले. या घटनेत त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून सैनीक देखील मृत्युमुखी पडला आहे.

हत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. मयत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह (25) आणि मयत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (26) असे आहे. दोघेही बिहार राज्यातील मुळ रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. घटनेच्या वेळी त्याची पत्नी गरोदर होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment