औरंगाबाद : लवकरच काही महिन्यात राज्यात 12 हजार 500 पोलिस भरती प्रक्रीया दोन टप्प्यात केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण मुद्द्यामुळे पोलिस भरती प्रक्रीया स्थगीत करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चा पदाधिका-यांसमवेत बोलणी केली असून त्यांनी पोलिस व वैद्यकीय भरतीसाठी अनुकुलता दाखवली असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगीतले. औरंगाबा ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयाने आयोजीत केलेल्या महिला बिट अंमलदार परिसंवाद व आढावा बैठकीच्या कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते.
पुढे बोलतांना गृहमंत्र्यांनी म्हटले की पहिल्या टप्प्यात 5300 व दुस-या टप्प्यात 7200 अशा पद्धतीने पोलिस भरती केली जाईल. 108 क्रमांक असलेल्या रुग्णवाहीकेप्रमाणे नागरिकांना पोलिस मदतीसाठी प्रोजेक्ट 112 ही संकल्पना आणली जाईल. औरंगाबाद येथे या योजनेवर काम सुरु आहे. या संकल्पनेसाठी पोलिस दलासाठी दोन हजार चारचाकी व अडीच हजार मोटार सायकल देण्यात येतील. या वाहनांना जीपीएस प्रणाली लावली जाईल.