जळगाव : जळगाव शहराच्या एमआयडीसी परिसरातील ममता बेकरीनजीक भंगार वस्तूच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागली. या आगीत गोडाऊनमधील पाण्याच्या टाक्या, बाथरुमसाठी लागणारे चिनी मातीचे भांडे, प्लास्टीकच्या जुन्या बाटल्या अशा वस्तू जळून खाक झाल्या.
या घटनेची माहीती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सदर आग नेमकी कशामुळे लागली व आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
आगीचा व्हिडीओ बघा…