मद्य खरेदी करणा-या अभिनेत्रीची फसवणूक करणारे दोघे अटकेत

मुंबई : मराठी अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक करणा-या दोघांना साकीनाका पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. या अभिनेत्रीने सन 2019 मधे ऑनलाईन वाईन मागवली होती. त्यावेळी वाईन शॉप कर्मचा-याने अभिनेत्रीच्या बॅंक खात्याची माहिती घेत ऑनलाईन फसवणूक केली होती. बरकत शहाबुद्दीन व उन्नस कमरुद्दीन खान अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. साकीनाका पोलिसांनी आठ दिवस राजस्थानात राहुन शिताफीने दोघांना अटक केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख व त्यांच्या पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षक सुनीता भोसले, पोलीस शिपाई संग्राम जगताप आदींनी आरोपीची माहिती काढत बरकत व उन्नत या दोघांना रामगड येथून ताब्यात घेत अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here