जळगाव : मुक्ताईनगर येथील श्री कॉलनीतील रहिवासी रविंद्र उर्फ माया माधवराव तायडे या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने शिताफीने अटक करण्यात यश मिळवले. त्याला मुक्ताईनगर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
रविंद्र तायडे हा पिस्टलच्या धाकावर दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजताच त्यांनी आपल्या सहका-यांना मुक्ताईनगर येथे रवाना केले. पथकातील सहायक फौजदार राजेंद्र पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. श्रावण जवरे, गोपीचंद सोनवणे, विजय कचरे यांच्या पथकाने गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या रविंद्र तायडे यास शिताफीने सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून बेकायदा पिस्टल मिळून आले. त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कब्जातील पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.