जळगाव : मेहरुण परिसरात राहणा-या एका कुटूंबातील उपवर तरुणाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन्ही बाजूने संमती झाल्याचे चित्र असतांना उपवर मुलाच्या काकाने बोदवड तालुक्यातील उपवर मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. उपवर मुलगा कामधंदा करत नसल्याची माहिती काकाने मुलीच्या कुटूंबीयांना दिली. तुम्ही तुमची मुलगी कशी काय देता? असा प्रश्न उपवर मुलाच्या काकाने मुलीकडील नातेवाईकांना विचारला.
त्यावर मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांना घडलेला सर्व प्रकार कथन केला. ठरत असलेल्या लग्नात आडकाठी का आणतो याचा जाब विचारण्यासाठी उपवर मुलाच्या वडीलांनी त्यांच्या भावाकडे विचारणा केली. लग्नात आडकाठी आणणा-या भावाने जाब विचारणा-या भावाला सळईने मारहाण केल्याची घटना मेहरुण परिसरात घडली. दोन्ही गटात झालेल्या धुमश्चक्रीत उपवर मुलाचे वडील जखमी झाले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 52/21 भा.द.वि. 326, 323, 504, 506 143, 147, 148 व 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. मोरे करत आहेत.