बजेट 2021 – होमलोनसाठी दिड लाखापर्यंतची सुट वाढवली एक वर्षासाठी

मुंबई : होम लोन घेणा-यांना या आर्थिक बजेटमधे दिलासा देण्यात आला आहे. सेक्शन 80EEA च्या अंतर्गत दीड लाखांच्या व्याजावर मिळणारी अतिरिक्त सूट पुढील वर्षभरासाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे स्वत:चे घर घेण्याची इच्छा बाळगणा-या होमलोन कर्ज धारकांना दिलासा मिळाला आहे.

ही योजना आता 31 मार्च 2022 पर्यंत राहणार आहे. पुर्वी या योजनेची मर्यादा 31 मार्च 2021 अखेर होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायात झळाळी येणार असल्याचे बोलले जात आहे. सर्व सामान्य नागरिकांना परवडण्याच्या दृष्टीने घर मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून सेक्शन 80EEA अंतर्गत सन 2019 च्या अर्थसंकल्पात हा नियम लागू केला होता. या योजनेअंतर्गत दिड लाख रुपयांची अतिरिक्त सुट मिळते. सदर सवलत सेक्शन 24 पेक्षा वेगळी आहे.

स्टॅंप मुल्य 45 लाखाहून अधिक असता कामा नये ही सेक्शन 80EEA ची सवलत मिळण्यासाठी अट आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता या ठिकाणी घराचा कार्पोरेट एरीया 60 स्क्वेअर से.मी. अथवा 645 स्क्वे. फुट असण्याची अट या सवलतीसाठी आवश्यक आहे. तसेच इतर शहरांसाठी हा कार्पोरेट एरिया 90 मिटर अथवा 968 स्क्वे. फुट असणे गरजेचे राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here