गांजा वाहतुकीतील फरार आरोपीस अटक

जळगाव : ट्रकने नारळाच्या झाडाची वाहतूक करत असल्याची बतावणी करुन चोरुन लपून लाखो रुपयांच्या गांजाची वाहतुक करणारा ट्रक एमआयडीसी पोलिसांनी 25 ऑगस्ट रोजी महामार्गावर पकडला होता.  या घटनेतील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

गांजाची चोरटी वाहतुक करणारा ट्रक गेल्या 25 ऑगस्ट रोजी पकडण्यात आला होता. भुसावळ येथून जळगावच्या दिशेने येत असलेल्या संशयीत ट्रकची (एमएच 42 टी 2125) थांबवून तपासणी केली असता त्यात नारळाच्या झाडाखाली गांजाच्या दोन गोण्या आढळून आल्या होत्या. त्यावेळी ट्रकच्या पुढे पुढे धावणारी कार (एमएच 18 एजे 2507) देखील थांबली होती. मात्र ट्रकची झडती सुरु होताच कारमधील आरोपी कारसह पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

या घटनेनंतर मुक्तार अब्दुल रहिम पटेल (रा. लोहारा ता. बाळापुर जिल्हा अकोला) यास 26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. फरार आरोपी आशिक सुलेमान मौले (पटेल) यास 1 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस पथकाने अटक केली आहे. अटकेतील आरोपी आशिक सुलेमान मौले हा ट्रकच्या पुढे पुढे पायलटींग करण्याचे काम करत होता. पोलिसांना बघून तो घटनेच्या दिवशी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. ट्रकला पायलटींग करणा-या कारमधील आशिक सुलेमान मौले याचे साथीदार अरमान चिंधा पटेल व शेख आसिफ शेख मुनाफ हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here