अमळनेर : अमळनेर नगरपाीकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव महापालीकेच्या अतिरिक्त उपायुक्तपदी बढतीवर बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नविन नियुक्ती झालेली नाही. 7 फेब्रूवारी 2020 रोजी त्यांची ऊदगीर येथून अमळनेर नगरपालीकेत बदली झाली होती.
अमळनेर येथे त्यांचा अवघा १ वर्षाचा कार्यकाळ ठरला आहे. त्या एमबीबीएस झाल्या असून अत्यंत कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ ठरला आहे. नविन मुख्याधिकारी नियुक्ती होईपर्यंत तहसिलदारांकडे प्रभार देवून 2 रोजी त्या जळगांव महापालीकेत अतिरिक्त उपायुक्त पदाचा पदभार स्विकारणार असल्याचे समजते.