जळगाव : भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील गांधी नगर भागात परिविक्षाधिन सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस पथकाच्या मदतीने 1 फेब्रुवारी रोजी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत दिपक सिताराम पाटील याच्या घरात सुरु असलेल्या कल्याण मटका सट्टा जुगाराच्या खेळावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोख 8765 रुपयांसह एकुण 10 हजार 815 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स.पो.नि. मंगेश गोटला यांच्यासह कर्मचारी इश्वर भालेराव, उमाकांत पाटील, रमन सुरळकर, संदेश निकम, सुमन राठोड, प्रशांत परदेशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. नव्याने रुजू झालेले परिविक्षाधीन सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ माजली आहे.