शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू

जळगाव : खोल विहीरीतील पाण्याच्या पातळीच अंदाज घेत असतांना पाय घसरल्याने दहीगाव तालुका यावल येथील शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
प्रेमचंद रामदास महाजन असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे.

याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हे.कॉ. सिकंदर तडवी व शेख असलम शेख पुढील तपास करत आहेत. मयत प्रेमचंद महाजन यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व सुना – नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here