खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी

On: February 4, 2021 11:27 AM

मुंबई : पुण्याच्या भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी रा.कॉ.चे नेते एकनाथराव खडसे यांची त्यांच्या कन्येसह ईडीकडून चौकशी झाली. ईडीला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.

ईडीने एकनाथराव खडसे यांच्याविरुद्ध ईसीआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा मिळण्याच्या मागणीसह उच्च न्यायालयात खडसे यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. शिंदे व पितळे खंडपिठासमक्ष या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडी अटक करणार नसल्याची हमी देणार असेल तर एकनाथराव खडसे याचीका मागे घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment