दिराचा विधवा भावजयीवर अत्याचार

On: February 4, 2021 8:41 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत राहणा-या व नात्याने दिर असलेल्या नराधमाने विधवा भावजयीवर मध्यरात्री लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 4 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीतास फुले मार्केट भागातून अटक केली आहे. या घटनेतील पिडीतेच्या पतीचे गेल्या वर्षभरापुर्वी निधन झाले आहे. ती सासु, सासरे, दिर व मुलांसह राहते. गुन्हा दाखल झाल्यानंतर स.पो.नि. अमोल मोरे यांच्यासह उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, विजय बाविस्कर, सचिन चौधरी व सचिन पाटील यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment