गावी जाण्यासाठी बस स्थानकातून पळवली एसटी

On: February 4, 2021 10:02 PM

लातूर : शेवटची बस हुकल्यामुळे मध्यरात्री गावी जायचे कसे या विवंचनेत असलेल्या तरुणांनी चक्क डेपोमधून एसटीच पळवल्याची घटना लातुर जिल्ह्यात घडली. दारुच्या नशेतील तरुणांकडून हे कृत्य घडल्याचे समजते.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी बस स्थानकात हा प्रकार घडला. पळवून नेलेल्या बसने वाटेत दोन विज खांबांना जोरदार धडक दिली. त्यामुळे विजेचा खांब जमीनीवर कोसळला. पहाटेच्या वेळी आपल्या ताब्यातील बस जागेवर नसल्याचे बघून वाहक व चालक हवालदील झाले. शोधाशोध केल्यानंतर ती बस शेळगी या गावात सापडली. मात्र एवढे होवून देखील या प्रकरणी एसटी व्यवस्थापनाने पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment