विस लाख रुपयांची लाच भोवली – सहायक रचनाकार एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर : अवसायनात गेलेल्या सुतगिरणीच्या जागेचे सरकारी मुल्यांकन करुन देण्याकामी 45 लाखापैकी 20 लाख रुपयांचा लाचेचा प्रथम हफ्ता घेतांना सहायक रचनाकारास रंगेहाथ पकडण्याची घटना आज कोल्हापुरात घडली.

गणेश हनुमंत माने (वर्ग 2 अधिकारी) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या अधिका-याचे नाव आहे. गणेश माने हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सह जिल्हा निबंधक कार्यालयात सहाय्यक रचनाकार पदावर आहेत. याप्रकरणी तक्रारदार एका सुतगिरणीचे अध्यक्ष असून ती संस्था सरकारने अवसायनात काढली आहे. सुतगिरणीचे मुल्यांकन तात्काळ होवून दाखला मिळण्याकामी तक्रारदाराने गणेश माने यांची सातत्याने भेट घेतली होती.

21 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली होती. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेल्या चहाच्या टपरीवर विस लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतांना गणेश माने यांचेवर एसीबीच्या पथकाने झडप घातली.

पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार संजू बंबर्गेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, मयुर देसाई, चालक सुरज अपराध यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here