जळगाव जिल्ह्यातील जवान राहुल पाटील यास वीरमरण

On: February 6, 2021 8:18 AM


जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल येथील जवान राहुल लहू पाटील यास भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावतांना आज 5 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वीरमरण आले. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी जळगाव जिल्ह्याच्या या सुपुत्रास हौतात्म्य आल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

राहुल पाटील याच्यावर सरकारी इतमामात अंतीम संस्कार केले जातील. जवान राहुल पाटील हा पंजाबच्या फजलखां येथील जवानांच्या निवासस्थानात वास्तव्यास होता. आजच सकाळी त्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून परिवारासोबत संवाद साधला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment