जळगाव : मुलांना चांगली शिस्त लावण्यासह त्यांना मोबाईल व व्हिडीओ गेमपासून लांब करुन मैदानी खेळाकडे वळवण्याचा पोलिस कराटे व स्केटींग क्लबचा हेतू आहे. देशासाठी चांगला खेळाडू तयार करणे हा देखील एक चांगला हेतू यामागे आहे. कराटेचे प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण शिकावे असे जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केले आहे.
फिट इंडीया मुव्हमेंट अंतर्गत प्रजासत्ताक दिनी वेटरनस इंडिया पेट्रिओटिक रन्स या खुल्या व विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पोलीस कराटे व स्केटिंग क्लबच्या खेळाडूंसह व पालकांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना पदक वितरण सोहळ्याप्रसंगी पोलिस अधिक्षक डॉ. प्र्विण मुंडे बोलत होते. महाराष्ट्र संघटनेने पोलीस क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी 41 पदके पाठवली होती. मुलांनी शिस्तबद्ध रित्या कराटे व स्केटिंगचे प्रशिक्षण घ्यावे व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे अशी अपेक्षा देखील यावेळी डॉ. मुंडे यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अमृता मुंडे, आरपीआय संतोष सोनवणे, मानव संसाधन विभागाचे पोलिस निरिक्षक अरुण धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.