“राम तेरी गंगा मैली” फेम राजीव कपूर यांचे निधन

On: February 9, 2021 5:18 PM

मुंबई : प्रसिद्ध दिवंगत अभिनेते अभिनेते ऋषी कपूर यांचे बंधू राजीव कपूर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांच्या एक्झिटमुळे बॉलीवूड मधे हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापुर्वीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे.

“राम तेरी गंगा मैली” या सन 1985 मधील चित्रपटापासून राजीव कपूर यांनी आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात केली होती. त्यानंतर एक जान है हम, आसमान, लव्हर बॉय, जबरदस्त, हम तो चले परदेस अशा चित्रपटातून त्यांनी भुमिका केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment