लॅपटॉप चोरट्यास एलसीबीने केली अटक

On: February 9, 2021 6:44 PM

जळगाव : जामनेर येथील जितेंद्र वसंत पाटील यांच्या ई – सेवा केंद्रातून सुमारे 25 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरुन नेणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत जामनेर पोलिसांच्या हवाली केला आहे. अक्षय प्रकाश छाडेकर असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

जामनेर शहरातील नवकार प्लाझा येथील दुकानातून सदर लॅपटॉप चोरीला गेला होता. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.37/21 भा.द.वि.380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पो.हे.कॉ.प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांनी अक्षय छाडेकर यास पाळधी ता. जामनेर येथुन शिताफीने मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले अक्षय प्रकाश छाडेकर (23) भोईगल्ली पाळधी ता. जामनेर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याला पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment