बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडे ईडीची धाड

On: February 10, 2021 3:13 PM

पुणे : पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर आणि हॉटेल व्यावसायीक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड पडली आहे. अविनाश भोसले यांची ईडीकडून सातत्याने चौकशी देखील गेल्या काही दिवसापासून सुरु होती. काही वर्षापुर्वीच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई होत असल्याचे समजते.

आज सकाळी आठ वाजेपासून ईडीचे अधिकारी भोसले यांच्या कार्यालयात हजर झाले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात देखील भोसले यांच्या पुण्यासह मुंबईतील एकुण 23 ठिकाणी ईडीने धाड टाकली होती. अविनाश भोसले यांचे जावई कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांना देखील ईडीने काही दिवसांपुर्वी नोटीस पाठवली असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment