जळगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखुजन्य पदार्थ पानमसाले विक्री करणा-या तिघांवर आज धडक पोलिस कारवाई करण्यात आली. कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे तंबाखुजन्य पानमसाला विक्रेत्यांच्या गोटात खळबळ माजली आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या मुद्देमालासह विक्रेत्या स्त्री पुरुषास अटक करण्यात आली आहे. या पकरणी तिसरा विक्रेता फरार होण्यात यशस्वी झाला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी कंवर नगर परिसरात सदर कारवाई केली.
यातील पहिल्या कारवाईत कंवर नगर येथील रमेश जेठानंद चेतवाणी याच्या घरातून 2 लाख 4 हजार 436 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत रमेश चेतवाणी यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. दुस-या कारवाईत खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्स, सिंधी कॉलनी येथील खुशी पान सेंटर येथून 38 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल विक्रेत्या महिलेसह ताब्यात घेण्यात आला. तिस-या कारवाईत 55 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र या मुद्देमालाचा विक्रेता दिपक रमेश चेतवाणी हा मुद्देमाल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या अधिसुचनेनुसार अन्न सुरक्षा मानक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.सदर कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुनिल सोनार, पोलिस नाईक मिलींद सोनवणे, पो.कॉ. सुधीर सावळे, पो.कॉ. सचिन पाटील, महिला पो.कॉ. सपना येरगुंटला, जयश्री बाविस्कर तसेच सहायक पोलिस अधिक्षक कार्यालयातील हे.कॉ. विजय काळे, हे.कॉ. कैलास सोनवणे, पो.कॉ. निलेश पाटील, रविंद्र मोतीराया, महिला पोलिस नाईक उषा तिवाणे, वैशाली सोनवणे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.