गॅंगरेपसह महिलेची हत्या – तिघे आरोपी अटकेत

On: February 11, 2021 9:53 AM

अमरावती : आदिवासी महिलेस सलग चार दिवस मद्यप्राशन करण्यास भाग पाडून सामुहीक बलात्कारानंतर तिची हत्या करणा-या नराधमांना अमरावती पोलीसांनी जेरबंद केले आहे. शिरखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईत निलेश मेश्राम, विनोद तुकाराम वानखडे, सुधीर रघुपती वानखडे अशा तिघांना अटक केली आहे.

अमरावती जिल्ह्याच्या शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव येथील एका आदिवासी महिलेची 5 फेब्रुवारी रोजी लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शिरखेड पोलिसांच्या पथकाने विष्णोरा येथील निलेश मेश्राम यास सर्वप्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात उघड झालेल्या तळेगाव येथील उर्वरीत सुधीर रघुपती वानखडे (26), विनोद तुकाराम वानखडे (40) यांना क्रमाक्रमाने अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींवर भा.द.वि. 302, 376, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 फेब्रुवारी रोजी या घटनेतील मयत महिलेस रिद्धपूर येथील एका विट भट्टीवरुन उचलण्यात आले होते. त्यानंतर तिला मद्यप्राशन करण्यास भाग पाडून तिच्यावर सामुहीक लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment